शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान गरजेचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 11:06 PM

अपंग दिनानिमित्त रॅली : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे प्रतिपादन 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  लोकशाही सक्षम आणि बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणी करुन दिव्यांग मतदारांनीही मतदान करावे. त्यांच्यासाठी मतदान केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व समाजकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शासकीय तांत्रिक  महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. जे. ए. शेख, उपजिल्हाधिकारी  तुकाराम हुलावळे  उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, मनपा़ उपायुक्त रवींद्र जाधव, जि़प़उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल, तहसीलदार अमोल मोरे, संजय शिंदे, जि़प़ समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर आदी उपस्थित होते. कोमल कर्डक यांनी सांकेतिक भाषेत दिव्यांगांना मान्यवरांच्या भाषणांची माहिती  दिली.दिव्यांग घटकांना सामावून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ असे घोषवाक्य जाहीर केले आहे. तसेच अति विशेष व्यक्तींचा दर्जाही देण्यात आला आहे. त्यानुसार दिव्यांग  घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदान केंद्रांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. जेणेकरुन मतदारांना मतदान करणे सुलभ होईल. यावषार्पासून दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणि पुन्हा घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती व मतदारांपर्यंत त्यांचे हक्क व अधिकार पोचविण्यासाठी आतापर्यंत विविध कायदे, नियम करण्यात आले आहेत. अलिकडेच देशातील सर्व दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक असा कायदा तयार करण्यात आला आहे, असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले़यावेळी रघुनाथ केले वाक्श्रवण विद्यालय, श्री संस्कार मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये सादर केली. जगदिश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. उपविभागीय अधिकारी मिसाळ यांनी आभार मानले. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, रत्नाकर वसईकर  उपस्थित होते. दिव्यांगांची रॅलीजिल्हाधिकारी कार्यालयापासून दिव्यांगांची रॅली काढण्यात आली. शहरातील विविध विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अतुल निकम, नायब तहसीलदार प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.  

टॅग्स :Dhuleधुळे