शिक्षक मतदार संघासाठी ११ पर्यंत ३२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 12:30 IST2018-06-25T12:21:58+5:302018-06-25T12:30:35+5:30
धुळे जिल्हा : मतदानासाठी शिक्षक येण्यास सुरुवात

शिक्षक मतदार संघासाठी ११ पर्यंत ३२ टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे़ सकाळी ७ ते ११ वाजेपावेतो जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रात सरासरी ३२़३४ टक्के मतदान झाले होते़ दरम्यान, मतदान करण्यासाठी शिक्षक येण्यास सुरुवात झाली आहे़
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात १२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत़ त्या ठिकाणी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना आवश्यक ते सर्व साहित्य रविवारीच वाटप करण्यात आले होते़ या निवडणुकीसाठी जिल्ह्यात १२ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. त्यात धुळे तालुक्यात ५, शिरपूर तालुक्यात ३, साक्री व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी दोन-दोन मतदान केंद्रे अशी एकूण १२ मतदान केंद्रे आहेत. त्यात मतदानास सकाळी ७ वाजेपासून सुरुवात करण्यात आली़ सकाळी ११ वाजेपर्यंत धुळे २७़१० टक्के, साक्री २१़१५ टक्के, शिंदखेडा २५़७४ टक्के, शिरपूर ५१़६४ टक्के असे एकूण जिल्ह्यात ३२़३४ टक्के मतदान झाले़