मतदारांनी विकासाला पुन्हा कौल दिला आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:10 IST2019-05-23T22:09:53+5:302019-05-23T22:10:36+5:30
विशेष मुलाखत । विजयी उमेदवार

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाला असून, धुळे मतदार संघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर त्यांच्याशी झालेला संवाद असा-
प्रश्न : मोठ्या फरकाने विजय मिळेल अशी अपेक्षा होती?
उत्तर : निश्चितच.मतदारांनी पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून माझ्यावर विश्वास दाखविला आहे. गेल्या पाच वर्षात मतदार संघात अनेक विकास कामे केली असून, मतदारांनी विकासाला पुन्हा कौल दिलेला आहे.
प्रश्न: मोदींची लाट कायम होती का?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाचवर्षात अनेक धाडसी व विकासाभिमुख निर्णय घेतले. त्यांच्यामुळे जागतिक पातळीवर भारताचा लौकीक वाढला.मतदारांमध्ये मोदी यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे अशीच भावना मतदारांमध्ये होती. मोंदींची लाट यावेळीही कायम होती.
प्रश्न: यशाचे श्रेय कोणाच?
उत्तर : मिळालेल्या भरघोस यशात सर्वांचा सहभाग आहे. भाजप-शिवसेना व इतर मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा यशस्वी सांभाळली. प्रत्येक गावागावापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. केंद्र शासनाने राबविलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविल्या. त्याचाच निवडणुकीत फायदा झालेला आहे. विरोधकांकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नव्हता. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली. त्यात यश मिळाले आहे.