शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्याच्या खरेदीसाठी ग्रामस्थांची उडतेय झुंबड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 21:50 IST

शासन नियमांची पायमल्ली : बाजारपेठेत विनामास्क सर्रास वावर

धुळे : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या पातळीवरुन प्रयत्न सुरु असताना नागरिकांनी देखील प्रतिसाद देणे गरजेचे आहे़ मात्र ग्रामीण भागातील जनतेकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र सध्या शहरातील बाजारपेठेत पहावयास मिळत आहे़ विनामास्क वावर आणि अनावश्यक गर्दी होत असल्याने शासन नियमांची एकप्रकारे पायमल्लीच असल्याचे अधोरेखित होत आहे़ हे रोखण्यासाठी कोणत्याही प्रशासकीय यंत्रणा नसल्याचे चित्र स्पष्ट आहे़कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे़ तो रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले़ त्यामुळे शहरातील बाजारपेठेसह सर्वच व्यवहार ठप्प होते़ कालांतराने त्यात बदल करण्यात आल्यामुळे अनलॉकचा काळ सुरु झाला़ त्यातही काही अटी-शर्थी लावण्यात आल्या होत्या़ त्या अनुषंगाने बाजारपेठेतील व्यवहारांना सुरुवात झाली़ त्यात मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी टाळणे असे काही प्राथमिक निकषाच्या आधारावर व्यवहार पूर्ववत करण्यात आले़ असे असूनही सध्याच्या परिस्थितीत बिनधास्तपणे आणि ते ही विनामास्क वावरणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही़ बाजारपेठेत अनावश्यक गर्दी वाढत आहे़ ती रोखण्यासाठी कोणाकडेही ठोस पर्याय उपलब्ध नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे़महापालिकेच्यावतीने वेळोवेळी बाजारपेठेत मोहीम राबवून सम-विषम संख्येप्रमाणे दुकाने सुरु आहेत की बंद आहेत आणि विनामास्क कोणी फिरत आहेत का, याचाही शोध घेऊन संबंधितांवर जागेवरच दंडात्मक कारवाई केली जात आहे़ हजारो लोकांवर कारवाई करुन त्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे़अशी काहीसी स्थिती असताना आणि कारवाई होऊ शकते हे माहित असताना देखील त्याची कोणत्याही प्रकारची भीती ग्रामीण जनतेमध्ये दिसून येत नसल्याचे समोर येत आहे़ लग्नातच नाही तर अंत्ययात्रेला देखील मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे़ जास्तीचे लोकं दिसल्यास कारवाईचे संकेत आहेत़ हे देखील माहित असून देखील साखरपुडा आणि त्याची खरेदी करण्यासाठी ग्रामीण जनतेची अक्षरश: झुंबड उडत आहे़ ही छोटीशी वाटणारी बाब मात्र याकडे कोणीही गांभिर्याने घेताना दिसून येत नाही़ग्रामीण जनतेला एकतर कोरोनाची भीती वाटत नसावी, अथवा इतके प्रबोधन आणि जनजागृती सुरु आहे त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत नसावी अशी शक्यता आहे़ प्रबोधन हे तळागाळापर्यंत झाले पाहिजे़ तरच ग्रामीण जनता त्या नुसार अंमलबजावणी करेल़ नाहीतर गर्दी वाढणार आणि रुग्ण संख्या वाढू शकते असा अंदाज यातून स्पष्ट होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे