शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

अस्वच्छतेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST

गावातील भात नदीच्या किनाऱ्यावर राष्ट्रपुरुषांचे पुतळे आहेत. तसेच विविध समाज मंदिरे आहेत. या ठिकाणी ग्रामस्थांचा सारखा वावर असतो. मात्र, ...

गावातील भात नदीच्या किनाऱ्यावर राष्ट्रपुरुषांचे पुतळे आहेत. तसेच विविध समाज मंदिरे आहेत. या ठिकाणी ग्रामस्थांचा सारखा वावर असतो. मात्र, याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण झालेली दिसून येते. त्यामुळे या भागात नेहमीच दुर्गंधी येते. गावात मांस विक्रेत्यांची अनेक दुकाने आहेत. ते कोंबड्यांची पिसे नदीपात्रातच टाकत असतात. काही विक्रेते तर ही पिसे रस्त्यावरच टाकून मोकळे होतात. त्यामुळे गावाच्या अस्वच्छतेत भर पडत आहे. एकीकडे ‘स्वच्छ गाव-सुंदर गाव’ ही संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर दुसरीकडे काही जणांमुळे गावात अस्वच्छता होत आहे. गावात अस्वच्छता निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, सरपंच सोनीबाई भील, उपसरपंच अंकिता पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी याकडे लक्ष देऊन गावाच्या भात नदी पात्रातील दलदलयुक्त घाणीचे साम्राज्य दूर करून या ठिकाणी तत्काळ स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेच्या निषेधार्थ व ग्रामपंचायतीचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबूराव पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वल भगवंतराव बोरसे, वीर एकलव्य संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश श्रीराम भील, बुटा भील, राजेंद्र भील, बेबीबाई भील, अक्काबाई भील, मंगलबाई भील, पूजाबाई भील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया-

कापडणे गावाच्या भात नदीपात्रात व गावाच्या चौकाचौकांत मटण, कोंबडी विक्रीचा सर्रास व्यवसाय सुरू आहे; परंतु यामुळे त्या-त्या भागातील मंदिरे, स्मारके, मुख्य वास्तू यांचे पावित्र्य धोक्यात येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने या सर्व मांस विक्रेत्यांना गावाच्या एकाच ठिकाणी एकाच छताखाली व्यवसायाची परवानगी द्यावी.

- उद्योजक अरुण पुंडलिक पाटील,

प्रतिक्रिया-

गावाच्या भात नदीच्या अगदी किनाऱ्यालगत राष्ट्रपुरुषांचे पुतळे आहेत, मंदिरे आहेत. या अस्वच्छतेमुळे त्यांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. कापडणे ग्रामपंचायतीने सदर व्यावसायिकांना पर्यायी जागा देऊन स्वच्छता करावी.

- राजेंद्र बाबूराव पाटील, सदस्य : पंचायत समिती - कापडणे