माजी उपनगराध्यक्ष विलास खोपडे यांचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 23:21 IST2020-08-30T23:14:39+5:302020-08-30T23:21:35+5:30

आत्महत्या केली की काही दुर्घटना घडली याचा शोध

Vilas Khopde's body was found | माजी उपनगराध्यक्ष विलास खोपडे यांचा मृतदेह सापडला

dhule

धुळे : महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती, माजी उपनगराध्यक्ष विलास खोपडे यांचा मृतदेह अक्कलपाड्यातील धरणात रविवारी सापडला़
रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अक्कलपाडा धरणात एक जण असल्याची माहिती साक्री पोलिसांना मिळाली़ त्यानुसार तातडीने पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोध सुरु केल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मृतदेहाची ओळख पटली असून त्यांचे नाव विलास खोपडे असल्याची माहिती साक्री पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली़ त्यांनी आत्महत्या केली की काही दुर्घटना घडली याचा शोध पोलीस घेत आहेत़ अकस्मात मृत्यूची नोंद साक्री पोलिसात करण्यात आली,

Web Title: Vilas Khopde's body was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे