विखरण येथे मयत धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील चढले मोबाईल टॉवरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 03:07 PM2018-12-07T15:07:06+5:302018-12-07T15:08:26+5:30

आत्महत्येचा इशारा : कुुटुंबाला  योग्य न्याय मिळाला नसल्याचा आरोप, त्यांनी रोहयो, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्र्यांसह मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

On Vikharan, the son-in-law of Narayan Patil's son Narendra Patil went to the top of the tower | विखरण येथे मयत धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील चढले मोबाईल टॉवरवर

विखरण येथे मयत धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील चढले मोबाईल टॉवरवर

Next
ठळक मुद्देधर्मा पाटील यांच्या आत्महत्येस वर्ष होवूनही दोषींवर कारवाई नाहीमध्यस्थी करणारे मंत्री ठरले अपयशीघटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी

आॅनलाइन लोकमत 
शिंदखेडा (जि. धुळे)  : मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय न मिळाल्याने आणि दोषींवर अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आत्महत्या करणार असल्याचा इशारा धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांनी दिला आहे. ते विखरण गावातील मोबाईल टॉवरवर चढून बसले आहे. त्यांनी या संदर्भात  मुख्यमंत्र्यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवले आहे.
शुक्रवारी दुपारी १२ वाजेपासून विखरण गावातील रस्त्यालगत असलेल्या मोबाईल टॉवरवर चढले आहेत. 
यासंदर्भात नरेंद्र पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस एक वषार्चा कालावधी होत आला आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत दोषींवर कारवाई झाली नाही. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देणारे आणि या प्रकरणात मध्यस्थी करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अपयशी ठरले आहेत. याची जबाबदारी घेऊन या मंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. हे मंत्री जर स्वत:ची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत असतील तर आपण या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे पत्र ई-मेलद्वारे धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. 
घटनास्थळी ग्रामस्थ जमले आहे. तर जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि अन्य अधिकारी पोहचले असून नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरु आहे.


 

Web Title: On Vikharan, the son-in-law of Narayan Patil's son Narendra Patil went to the top of the tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे