नुकसानग्रस्तांना १०० टक्के भरपाई मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:18 PM2019-11-08T12:18:43+5:302019-11-08T12:19:36+5:30

कमल बरोट : कापून ठेवलेल्या, उभ्या पिकासह व वनपट्टेधारकांनाही मिळेल लाभ

The victims will get 5 percent compensation | नुकसानग्रस्तांना १०० टक्के भरपाई मिळेल

dhule

Next

शिरपूर : अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत़ तालुक्यात कर्जदार ७ हजार २४८ व बिगर कर्जदार ५ हजार २९६ असे एकूण १२ हजार ५४४ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे़ कापून ठेवलेले पीक, वनपट्टे धारक तसेच उभ्या पिकाला १०० टक्के नुकसान भरपाई दिली जाणार आहे़
माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे परिचित तसेच मुंबई येथील एका विमा कंपनीचे अधिकारी असलेले कमल बरोट यांच्या उपस्थितीत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात गुरूवारी ७ रोजी बैठक घेण्यात आली़ त्यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार काशिराम पावरा, उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार आबा महाजन, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, आमदार अमरिशभाई पटेल यांचे स्वीय सचिव अशोक कलाल, माजी जि.प. उपाध्यक्ष के.डी. पाटील, तालुका कृषी अधिकारी निकुंभ, विमा कंपनी प्रतिनिधी सुभाष पवार, सुनील जैन आदी उपस्थित होते.
मुंबई येथील विमा अधिकारी बरोट यांनी समन्वय साधून तसेच पाठपुरावा करून शेतकºयांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले़
उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांनी बैठकीत सूचना देवून विमाधारक शेतकरी बांधवांची यादी, पीक विमा स्थिती, पंचनामे स्थिती, सरसकट केलेले पंचनामे, पीक कापणी याबाबत माहिती देवून तालुक्यात १२ हजार ५४४ शेतकºयांनी विमा काढला आहे असेही सांगितले. वनजमिनी पट्टे धारकांना देखील पिक नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांनी आवाहन केल्यानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा आंबिया बहारामध्ये अनेक फळ पिकांसाठी शासनाने भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई या कंपनी मार्फत तालुक्यातील शेतकरी बांधवांनी फळ पिक विमा योजनेचा तसेच इतर पिकांसाठी योग्य त्या विमा योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. या योजनेंतर्गत गतवर्षी देखील तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांना ९ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम मिळाली होती.

Web Title: The victims will get 5 percent compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे