मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:54+5:302021-02-05T08:46:54+5:30
जळगाव विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.एल.जी. सोनवणे यांचे व्याख्यान झाले. तसेच मराठीतील मौल्यवान ग्रंथांचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या ...

मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम
जळगाव विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.एल.जी. सोनवणे यांचे व्याख्यान झाले. तसेच मराठीतील मौल्यवान ग्रंथांचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात भरविण्यात आले. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत ३९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यात प्रीती मोहन कोर ११वी विज्ञान प्रथम, तेजल प्रवीण सावळे हिने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले. मराठी भाषेविषयी घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यात ऋतुजा पुंडलिक चव्हाण प्रथम तर गौरी कैलास सोनवणे हिने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले. तसेच काव्यवाचन स्पर्धेत एकूण २१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यात कु ऋतुजा पुंडलिक चव्हाण प्रथम तर राम विजय सोनवणे यांनी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले.
प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे यांनीदेखील ‘शिक्षक मी भाग्यवंत’ ही आपली कविता सादर केली. प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. शत्रुघ्न पाटोळे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुरेश सोनवणे व मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रकाश साळुंखे यांनीही कविता सादर केल्या. या सर्व स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ. शत्रुघ्न पाटोळे आणि प्रा.डी.पी. पाटील यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांसाठी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यात ग्रंथपाल प्रा. सचिन वाघ यांनी विद्यार्थ्यांना विविध ग्रंथाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रकाश साळुंखे यांनी केले. प्रा.डी.पी. पाटील, प्रा.एस. टी. सूर्यवंशी, प्रा. निखिल सोनवणे, प्रा. दत्तात्रय वाघमारे, प्रा. सचिन वाघ तसेच ग्रंथालयातील सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.