शासकीय गोदामातील ईव्हीएमची तोडफोड, बॅटऱ्या लंपास; देवपूर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Updated: January 10, 2024 16:49 IST2024-01-10T16:48:46+5:302024-01-10T16:49:03+5:30
या प्रकरणी तहसीलदार अरूण देवबा शेवाळे (वय ४०) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शासकीय गोदामातील ईव्हीएमची तोडफोड, बॅटऱ्या लंपास; देवपूर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
धुळे : देवपूर भागात केंद्रीय विद्यालयालगत असलेल्या शासकीय धान्य गोदामात राज्य निवडणूक आयोगाने ठेवलेल्या ईव्हीएम मशीनची तोडफोड करून त्यातील बॅटऱ्या लंपास केल्याची घटना ८ डिसेंबर २०२३ ते ९ जानेवारी २०२४ दरम्यान घडली. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तहसीलदार अरूण देवबा शेवाळे (वय ४०) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार केंद्रीय विद्यालयालगत असलेले शासकीय गोदाम क्रमांक १, २, ३ यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने ठेवलेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आदी साहित्याचे चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली. तसेच चोरट्यांनी या ईव्हीएममधील बॅटऱ्या लंपास केल्या आहेत. त्यांची किंमत ७८ हजार ७११ रुपये एवढी आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक सतीश घाटेकर करत आहेत. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे आदींनी भेट देऊन पाहणी केली.