अर्थे येथे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:35 IST2021-05-26T04:35:55+5:302021-05-26T04:35:55+5:30

एकूण १०० डोस देण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Vaccination at the senses | अर्थे येथे लसीकरण

अर्थे येथे लसीकरण

एकूण १०० डोस देण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच साहेबराव पाटील होते. यावेळी प्राचार्य आर. बी. महाजन, डॉ. संगमित्रा मंगळे उपस्थित होते.

यावेळी डॉ. तुषार रंधे यांनी ग्रामस्थांना लसीकरणाविषयी माहिती देऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. डॉ. प्रताप पवार सर वैद्यकीय अधिकारी यांचा कोरोना योद्धा म्हणून डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश वाघ, आरोग्य सहाय्यक, एम. एल. सय्यद आरोग्य सेवक, श्रीम. व्ही. बी. गावित आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका तुळसा दोरिक, श्रीम. आर. वाय. ठाकरे आरोग्यसेविका, दीपक गिरासे, एल. व्ही. पाटील, सोपान महाजन व सर्व आशा कार्यकर्त्या यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Vaccination at the senses