निजामपूर आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST2021-05-17T04:34:33+5:302021-05-17T04:34:33+5:30
पहिल्या दिवशी ११० नागरिकांना लस देण्यात आली. जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत निजामपूर उपकेंद्रात लस देण्याची सुविधा लोकांच्या सोयीसाठी ...

निजामपूर आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू
पहिल्या दिवशी ११० नागरिकांना लस देण्यात आली.
जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत निजामपूर उपकेंद्रात लस देण्याची सुविधा लोकांच्या सोयीसाठी व्हावी म्हणून ग्राम पालिकेने प्रयत्न केले. अखेर त्याला मंजुरी मिळाली. निजामपूर व जैताणेसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे झाली. शनिवारी सकाळी ९ वाजता ग्रामपालिका सरपंच नीलिमा मिलिंद भार्गव यांचे हस्ते केंद्राचे उदघाटन झाले. ज्येष्ठ नागरिक दगाजी मराठे यांना लस देऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी ४५ वर्ष वयापुढील ११० लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. इंदिरा नगरातील या उपकेंद्रात लसीकरण केंद्रास मंजुरी मिळाल्यानंतर निजामपूर ग्रामपालिकेने स्वच्छता केली होती. बाहेर मोठा शामियाना टाकला होता. नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या,पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. ग्रामपालिका व भानुबेन वाणी स्कूलचे लक्ष्मीकांत शाह यांचे संयुक्त उपक्रमातून लोकांना लसीकरणासाठी येण्या जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील भदाणे, प्रवीण सोनार, महिला आरोग्य कर्मचारी एस. बी. चव्हाण, विद्या धनगर, सरोज कुलकर्णी यांनी सेवा दिल्या. यावेळी पं. स. सदस्य सतीश राणे,मिलिंद भार्गव,उपसरपंच महेंद्र वाणी,सदस्य परेश वाणी, विजय राणे,गजानन शाह,दिलीप पवार,प्रकाश बच्छाव,
तेजस जयस्वाल आदींची उपस्थिती होती.