आरोग्य सेतू ॲपचा वापर वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST2021-04-05T04:32:08+5:302021-04-05T04:32:08+5:30
अवास्तव वीजबिलांना नागरिक हैराण धुळे : लाॅकडाऊन कालावधीत मीटरचे रीडिंग घेणे बंद होते. शिवाय सहा महिने वीज बिलेदेखील दिली ...

आरोग्य सेतू ॲपचा वापर वाढतोय
अवास्तव वीजबिलांना नागरिक हैराण
धुळे : लाॅकडाऊन कालावधीत मीटरचे रीडिंग घेणे बंद होते. शिवाय सहा महिने वीज बिलेदेखील दिली नाहीत; परंतु अनलाॅक झाल्यानंतर दिलेली बिले मात्र अव्वाच्या सव्वा असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. एकीकडे कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी सातत्याने होत असताना वीज बिलमाफी तर होत नाही; परंतु पाचपट अधिक बिल वसूल केले जात असल्याने संतापाची लाट आहे. अनेक पक्ष संघटनांनी या विरोधात आवाज उठविला आहे. वीजबिल माफ होण्याच्या आशेवर अनेकांनी वर्षभरापासून बिल भरले नाही. आता महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केल्याने एकत्र बिल भरणे महागात पडत आहे.
मोबाईल नेटवर्कची समस्या कायम
धुळे : ग्रामीण भागात काही कंपन्यांच्या मोबाईलला रेंज नसते. त्यामुळे फोन लागत नाही तसेच इंटरनेटला स्पीड मिळत नाही. अत्यावश्यक कामेदेखील विलंबाने होतात. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने या शिक्षणात मोबाईल रेंजअभावी गेल्या काही महिन्यांपासून अडथळे येत आहेत. ग्रामीण भागातील सरकारी कामकाजावरदेखील त्याचा परिणाम होत आहे. रिचार्जसाठी खर्च केलेला पैसा वाया जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच ग्रामीण भागातच नव्हे तर धुळ्यासारख्या शहरी भागातदेखील काही ठिकाणी काही कंपन्यांच्या सिमला रेंज नसते. वलवाडी, माराने, चितोड, मोहाडी, अवधान या भागात रेंजची समस्या आहे. शहरात आल्यावर मात्र रेंज पूर्ण मिळते. संबंधित कंपन्यांनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.