शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भुयारी गटारींमुळे डासांचे प्रमाण नाहीसे़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:28 IST

संडे अँकर । सिंगापूरच्या धर्तीवर साकारला जातोय शिरपूरला सांडपाणी शुध्दीकरणाचा प्रकल्प

शिरपूर : शिरपूरवासियांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गेल्या काही वर्षापूर्वी सिंगापूर-मलेशिया येथील जागतिक परिषदेला हजर राहिल्यानंतर पटेल बंधूनी त्याही पेक्षा अत्याधुनिक सांडपाण्याचा प्रकल्प शहरात साकारला आहे़ भुयारी गटारी तयार केल्यामुळे डासांचे प्रमाण नाहीसे झाले, त्याचबरोबर रस्त्यावर सांडपाणी व डबके होण्याचे प्रमाण टळले़ सांडपाणी शुद्ध करून त्या पाण्याचा वापर शेती, वृक्ष लागवड, बांधकाम करणाऱ्यांना, रस्ते साफसफाईला वापरले जात आहे़ सांडपाणी एकत्र करून ते शुध्दीकरण करण्याचा अभिनव व अत्याधुनिक प्रकल्प आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी राबविला आहे़अमरिशभाई पटेल यांनी निजर्तूंक पाणी मुबलक प्रमाणावर देवून ते एवढ्यावर समाधान न मानता शहरातील सांडपाणी भुयारी गटारींद्वारा एका ठिकाणी संकलन करून त्या पाण्याचा शुद्धीकरणाचा अभिनव प्रकल्प सुमारे बारा कोटी रुपये खर्चाचा साकारून जलसंधारणाच्या एका आगळ्या-वेगळ्या कामाला प्राधान्य दिले आहे.शिरपूर शहराला पुढील ३० वर्षात वाढणाºया लोकसंख्येला पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, अशी तरतूद पटेल बंधूनी केली आहे. एवढेच नव्हे तालुक्याच्या ग्रामीण भागातही पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून गाव-पाडा वस्ती येथे नळ पाणीपुरवठा योजना, हातपंप, वीजपंप सुविधा केली आहे. नदी-नाले यांचे पाणी अडविणे व जिरविण्यासाठी केटी बंधारे, साठवण बंधारे, भूमिगत बंधारे, शेततळी, गावतळीद्वारे जलपुनर्भरणाचे काम केले़ जलसंपदा टिकविण्याचे व वाढविण्याचे काम करीत आहेत़शहरातील कॉलनी व इतर वसाहतींमध्ये सुमारे ६७ किमी लांबीच्या भुयारी गटारी करण्यात आल्या आहेत़ तसेच २० किमी गावठाण क्षेत्रात गटारींचे काम पूर्ण झाले आहे़ अवघ्या दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला़ शहरात सांडपाणी दुर्गंधी पसरू नये म्हणून ठिकठिकाणी गॅस पाईप उभे केले आहेत़ कॉलनी वसाहतींमधील गटारींचे पाणी भुयारी गटारीमार्फत सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पापर्यंत पोहचत आहे़ कदाचित भुयारी गटारीमध्ये काही ब्लॉक झाले असल्यास तात्काळ अत्याधुनिक असलेल्या जेटींग मशिनद्वारे ते साप केले जाते़ तसेच डिसील्ट मशिनद्वारे गटारीतील चेंबरची वेळोवेळी साफसफाई केली जाते़ या प्रकल्पात जर्मनी येथून अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आली आहे़ स्काडा आॅपरेटींग सिस्टीमद्वारे बसल्या-बसल्या व्यक्ती संगणक प्रणालीद्वारे कामे करतात़नागरिकांसाठी काही महत्वाचेछताचे पाणी कुणीही भुयारी गटारींमध्ये सोडू नका़ तात्काळ सेफ्टीक टँक बंद करून सांडपाणी व संडासाचे पाण्याचे कनेक्शन भुयारी गटारीला जोडावे़ तसेच प्रत्येकाने कनेक्शन करतांना घरात बाथरुममध्ये ट्रॅप बसविणे अतिशय गरजेचे आहे़ जेणेकरून भुयारी गटारीतील दुर्गंधींचा वायू घरात शिरणार नाही़ शौचालयाची टाकी बंद केल्यामुळे डासांचे प्रमाण नाहीसे झाले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे