धनुर ग्रा.पं.मार्फत भूमिगत गटारींचे काम प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST2021-07-02T04:24:52+5:302021-07-02T04:24:52+5:30
सदर परिसरात भूमिगत गटार होत असल्यामुळे येथील रहिवासी समाधानी आहेत परंतु आता धनूर गावातील अन्य परिसरात राहणारे रहिवासी ग्रामस्थ ...

धनुर ग्रा.पं.मार्फत भूमिगत गटारींचे काम प्रगतीपथावर
सदर परिसरात भूमिगत गटार होत असल्यामुळे येथील रहिवासी समाधानी आहेत परंतु आता धनूर गावातील अन्य परिसरात राहणारे रहिवासी ग्रामस्थ देखील संपूर्ण गावातील जुन्या नादुरुस्त झालेल्या गटारींच्याऐवजी नवीन भूमिगत गटारचे बांधकाम होण्याची मागणी करीत आहेत. या मागणीला सरपंच सत्यभामाताई शिंदे यांनी दुजोरा देत ग्रामस्थांना सांगितले आहे की १४ व्या वित्त आयोगाच्या निधी मिळाल्यास संपूर्ण धनूर गावात अशाच प्रकारच्या सुबक व भक्कम भूमिगत गटार निर्मितीचे आश्वासन धनूर/लोणकुटे ग्रामस्थांना सरपंच सत्यभामाबाई शिंदे यांनी दिले आहे.
भूमिगत गटारींचे निर्माण प्रसंगी धनूर/लोणकुटे सरपंच सत्यभामाबाई रोहिदास शिंदे, उपसरपंच युवराज चौधरी सर,ग्रा.पं. सदस्यांपैकी कमलबाई पटेल, लताबाई चौधरी, मालुबाई शिंदे,माधुरी शिंदे, ग्रा.पं.कर्मचारी राजेंद्र वाघ सर,तसेच ग्रामस्थांपैकी राजेश संतोष भामरे, दिलीप रोहिदास भामरे, अरुणदादा शिंदे, पवन बोरसे, गणेश खैरनार, धनराज शिंदे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो कॅप्शन - धनूर ग्रामपंचायतमार्फत धनूर गावात भूमिगत गटारीच्या कामाची देखरेख करताना सरपंच सत्यभामाबाई शिंदे व ग्रामस्थ.