अनधिकृत गोठ्यामुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:43 IST2021-09-17T04:43:10+5:302021-09-17T04:43:10+5:30
प्रभाग १४ मध्ये म्हशींचा एक गोठा हा अनधिकृत आहे. स्वत:च्या मालकीची जागा नसताना त्यांनी अनधिकृत ४० म्हशींचा गाेठा बांधला ...

अनधिकृत गोठ्यामुळे आरोग्य धोक्यात
प्रभाग १४ मध्ये म्हशींचा एक गोठा हा अनधिकृत आहे. स्वत:च्या मालकीची जागा नसताना त्यांनी अनधिकृत ४० म्हशींचा गाेठा बांधला आहे. हा गोठा रहिवाशी क्षेत्रात असल्यामुळे अंबिका नगर, विठ्ठल नगरातील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरीकांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून धमकाविण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच या गोठ्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढत आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी सदरचा गोठा हा शहराबाहेर हलविण्यात यावा. त्याप्रकारचे आदेश देण्यात यावे अशी मागणी या परिसरातील रहिवाशी भारत मराठे, दत्तात्रय शेवतकर, श्याम अंपळकर, विजय लोकरे, बी. एम. कुलकर्णी, कैलास शेवतकर, अतुल घोडेस्वार, संजय मोराणकर, एस. बी. परदेशी, पिंटू बंगवर, अनिल लाडे, पी. एस. देवरे, जे. पी. सूर्यवंशी, भूषण माईनकर, सुनील मोरे, अरुण पाटील, रविंद्र मराठे, संजय लोकरे, आनंद प्रजापत, कृष्णा परदेशी, शरद पाटील, भागवत शेळके आदींनी केली आहे.