दिक्षार्थी जैनम बोरा यांचे अंतीम रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:21 IST2020-03-14T14:20:32+5:302020-03-14T14:21:28+5:30
शिरपूरात शोभायात्रा : समाजबांधवांची मोठी उपस्थिती

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : मालेगाव शहरातील मुमुक्षु दिक्षार्थी जैनम बोरा (१७) हे समाजाला उपदेश देण्यासाठी ३० एप्रिल रोजी संसार व मित्रपरिवारातून मुक्त होणार आहे. त्यांचा येथे अंतीम रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
मुमुक्षु दिक्षार्थी जैनम बोरा यांचे रविवार रोजी दुपारी दीड वाजता शहरातील करवंद नाक्यावरील के.जी. कंपाऊंड येथे परिवारासह आगमन झाले. तद्नंतर मुमुक्षु दिक्षार्थी जैनम बोरा यांची परिवारासह सजवलेल्या रथातून नुतन दिक्षार्थी जैनम बोरा यांच्या शोभायात्रेला प्रारंभ झाला.
शोभायात्रेनंतर शंकर नाना लॉन्स येथे चोरडिया परिवारातर्फे आयोजित अभिनंदन समारंभ सोहळा झाला. मुमुक्षु दिक्षार्थी जैनम बोरा यांचे वडील जितेंद्र बोरा यांनी जैनम बोरा यांच्या बालपणीची आठवण करून दिली.
नुतन दिक्षार्थी जैनम बोरा यांचे फुआ नवनीत चोरडिया व आत्या सुजाता चोरडिया यांनी अंतिम राखी सणाचा कार्यक्रम साजरा केला होता. लब्धी बोरा, तपस्या सभ्याता चोरडिया, निशा अबड या बहिणींनी मुमुक्षु दिक्षार्थी जैनम बोरा यांच्या हाताला अंतीम राखीचा धागा बांधताना यावेळी फुआ नवनीत चोरडिया रक्षा बंधनाचेगीत गायले.
याकामी ब्लेसिंग पाठशाळेचे मुला मुलींनी विविध प्रकारच्या धार्मिक नाटीका सादर केल्यात. यावेळी शैलेश संचेती (वैजापुर), महेंद्र अबड (नांदगाव) नासिक, धुळे, जळगाव, अमळनेर, नंदुरबार, शहादा आदी ठिकाणाहून दिक्षार्थी बोरा यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनंदन समारंभ सोहळ्यात शिरपूर श्रीसंघ, समरथ ग्रुप, साधुमार्गी श्रावक संघ, अरिहंत नवयुवक मंडळ तसेच नवयुवक ग्रुपतर्फे मुमुक्षु दिक्षार्थी जैनम बोरा यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रास्ताविक प्रा.संजय सुराणा यांनी केले व संघपती सुवालाल ललवाणी यांनी मनोगत व्यक्त केले.