उध्दव ठाकरे सभेसाठी धडगावच्या दिशेने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 13:10 IST2019-10-12T13:00:18+5:302019-10-12T13:10:28+5:30

विधानसभा निवडणूक : उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्हा दौरा, धुळ्यात स्वागत

Uddhav Thackeray sailed towards Dhadgaon for the meeting | उध्दव ठाकरे सभेसाठी धडगावच्या दिशेने रवाना

dhule

dधुळे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे धुळ्यातील गोंदूर विमान तळावर दुपारी १२ वाजून २२ मिनीटांनी आगमन झाले़ यावेळी माजी मंत्री डॉ़ सुभाष भामरे, पालकमंत्री दादा भूसे, खासदार संजय राऊत, शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी, हेमंत साळुंखे, भाजपचे मनोहर भदाणे, अतुल सोनवणे, संजय गुजराथी, अ‍ॅड़ पंकज गोरे, रविंद्र काकड, राजेंद्र पाटील, गुलाब माळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़ या पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले़ यानंतर लगेच ठाकरे हे विशेष हेलिकॉप्टरने नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील सभेकडे रवाना झाले़ त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत होते़ धडगाव येथील सभा आटोपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने पुन्हा गोंदूर विमानतळावर येतील आणि धुळे शहरातील महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या उमेदवारी प्रचारार्थ आयोजित क्युमाईन क्लब समोरील जागेवर होणाºया सभेकडे दाखल होतील़

Web Title: Uddhav Thackeray sailed towards Dhadgaon for the meeting

टॅग्स :Dhuleधुळे