अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरूण ठार, एक जखमी; बाभळे फाट्याजवळील घटना
By अतुल जोशी | Updated: November 8, 2023 20:12 IST2023-11-08T20:11:56+5:302023-11-08T20:12:08+5:30
या अपघातात उमेश कुवर व निखिल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल भदाणे हा गंभीर जखमी झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरूण ठार, एक जखमी; बाभळे फाट्याजवळील घटना
धुळे - बाभळे औद्योगिक वसाहती मधुन रात्रीच्या सुमारास काम आटोपून घराकडे निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धड़क दिली. या अपघातात दोन तरूण जागीच ठार झाले. तर एकजण जखमी झाला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्यानजिक मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास झाला. याप्रकरणी सोनगीर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली.
अपघातात उमेश सुभाष कुवर (२९, रा. डोंगरगाव ता. शहादा जि. नंदुरबार) निखिल आनंदा पाटील (३०, रा. मांडळ ता. शिंदखेडा) हे दोघे ठार झाले. तर अमोल संजय भदाणे (रा. मंगरूळ,ता. अमळनेर) हा जखमी झाला.
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे उद्योगिक वसाहती मधील एका कंपनीत उमेश सुभाष कुवर, निखिल आनंदा पाटील व अमोल संजय भदाणे हे तिघे कामाला होते. मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कंपनी मधून सुटी झाल्यानंतर ते मोटरसायकलने (एमच १९/बीझेड ०१४३) सोनगीरच्या दिशेने येत येत होते. मात्र, बाभळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात उमेश कुवर व निखिल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल भदाणे हा गंभीर जखमी झाला.