वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:40 IST2019-12-16T22:40:20+5:302019-12-16T22:40:54+5:30

गुरुद्वारनजिक अपघात : सडगावला शोककळा

Two young men die in a vehicle crash | वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

धुळे : भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने दुचाकी दुभाजकावर जावून आदळली़ या भिषण अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला़ तर तिसरा तरुणाला गंभीर दुखापत झाली़ ही घटना महामार्गावरील गुरुद्वारानजिक रविवारी घडली़ या घटनेमुळे सडगाव गावात शोककळा पसरली आहे़
धुळे तालुक्यातील सडगाव येथील तीन तरुण एका दुचाकीने धुळ्याकडे येत होते़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर गुरुद्वारापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या हॉटेल आॅर्किडजवळ भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली़ वाहनाची धडक अचानक बसल्याने दुचाकीवरील तरुणांचा तोल गेला़ या अपघातात दुचाकीसह तरुण दुभाजकावर जावून आदळले़ त्यांना त्यांना गंभीर दुखापत झाली़ त्यात समाधान ताराचंद मदने (२६), सिताराम मेघनर (२७) आणि किशोर न्याहळे या तीन तरुणांचा समावेश आहे़ अपघातानंतर धडक देणाºया वाहनधारकाने आपले वाहन न थांबविता तेथून पळून जाणे पसंत केले़ या तिघांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ तत्पुर्वीच गंभीर दुखापत झाली असल्यामुळे समाधान आणि सिताराम या दोघा तरुणांचा मृत्यू ओढवला़ तर किशोर या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ अपघाताची माहिती ते राहत असलेल्या सडगावला धडकताच रुग्णालयात त्यांच्या नातलगांसह हितचिंतकांनी गर्दी केली होती़ याप्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली़ फरार वाहनचालका याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला़ सडगाव गावात शोककळा पसरल आहे़

Web Title: Two young men die in a vehicle crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.