सीसीटीव्ही फुटेजवरुन दुचाकी चोरांना मालेगावहून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 08:37 PM2021-07-11T20:37:06+5:302021-07-11T20:37:31+5:30

धुळे शहर पोलीस : तीन दुचाकी हस्तगत, एक संशयित फरार

Two-wheeler thieves caught from Malegaon based on CCTV footage | सीसीटीव्ही फुटेजवरुन दुचाकी चोरांना मालेगावहून पकडले

सीसीटीव्ही फुटेजवरुन दुचाकी चोरांना मालेगावहून पकडले

googlenewsNext

धुळे : शहरातील अरिहंत ज्वेलर्स येथून दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्याच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन मालेगाव येथून शोधून काढत त्यांना जेरबंद करण्यात धुळे शहर पाेलिसांच्या पथकाला यश आले. ६५ हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी या चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेल्या आहे. त्यांच्यातील एक संशयित पोलिसांना पाहून फरार झालेला आहे.

एमएच १८ एएम ६०११ क्रमांकाची दुचाकी शहरातील अरिहंत ज्वेलर्ससमोरुन ७ जुलै रोजी चोरीला गेली होती. दुचाकीचा चोरीचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्याचा तपास सुरु असताना सीसीटीव्ही फूजेटचा आधार घेण्यात आला. शहर पोलीस ठाण्यातील शोध पथकाने तपासाला सुरुवात केली. चोरटे मालेगावचे असल्याचा अंदाज घेऊन पथक मालेगाव येथे पाेहचले. मालेगाव येथील जाफरनगर भागात जावून गोपनीय चाैकशी करण्यात आली. त्यात मोहम्मद शोएब उर्फ पापे फैयाज अहेमद (२६, रा. प्लॉट नंबर ९३, सर्व्हे नंबर ८, जाफरनगर, मोहम्मद अली रोड, मालेगाव जि. नाशिक) आणि अब्दुल सालीक अब्दुल रहेमान मोमीन (४३, रा. घर नंबर १४४, सर्व्हे नंबर ९३, जाफरनगर, मालेगाव जि. नाशिक) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, त्यांच्याकडून ६५ हजार रुपये किंमतीच्या ३ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. तसेच त्यांचा सहकारी अमजदअली जेनुलाबद्दीन अन्सारी (३९, रा. जाफरनगर, मालेगाव जि. नाशिक) हा संशयित पोलिसांना पाहून फरार झाला आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत.

पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक एन. एस. आखाडे, कर्मचारी भिकाजी पाटील, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, प्रसाद वाघ, प्रविण पाटील, मनीष सोनगीरे, अविनाश कराड, शेखर वाडेकर, शाकीर शेख, नितीन अहिरे, सचिन पगारे यांनी ही कारवाई केली आहे. फरार झालेल्या संशयिताचा शोध शहर पोलीस घेत आहेत.

Web Title: Two-wheeler thieves caught from Malegaon based on CCTV footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे