दुचाकी अपघातात पती ठार, पत्नी जखमी

By Admin | Updated: June 11, 2017 12:07 IST2017-06-11T12:07:09+5:302017-06-11T12:07:09+5:30

लामकानीजवळील घटना. प}ीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

In a two-wheeler accident, the husband dies, wife is injured | दुचाकी अपघातात पती ठार, पत्नी जखमी

दुचाकी अपघातात पती ठार, पत्नी जखमी

 ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.11- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीचा अपघात होऊन पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी लामकानी बारी जवळ घडली़  अशोक सुकदेव पाटील (वय 50 रा़ निकुंभे ता़ धुळे व ह़मु सत्यसाईबाबा कॉलनी, धुळे) यांना  तपासणी करून डॉक्टरांनी मयत घोषीत केल़े तर त्यांच्या पत्नी रमणबाई (वय 46) यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ 
अशोक पाटील हे तरवाडे येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होत़े ते  शनिवारी दुपारी पत्नी रमणबाई यांच्यासह दुचाकीने  चिंचवार येथे नातेवाईकांकडे गेले होत़े तेथून निकुंभे येथे शेताकडे जात असतांना दुपारी 3 वाजेच्या सुमारास लामकानी बारीजवळ समोरून भरधाव वेगाने येणा:या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाले. अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

Web Title: In a two-wheeler accident, the husband dies, wife is injured