दुभाजकाला धडकून दुचाकीसह दोघे फेकले गेले, एकाचा मृत्यू शेवाळी फाट्यावरील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: April 27, 2024 17:43 IST2024-04-27T17:42:00+5:302024-04-27T17:43:43+5:30
शेवाळी फाट्यावर आल्यानंतर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली.

दुभाजकाला धडकून दुचाकीसह दोघे फेकले गेले, एकाचा मृत्यू शेवाळी फाट्यावरील घटना
धुळे : भरधाव जाणारी दुचाकी दुभाजकावर धडकली. या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना साक्री तालुक्यातील शेवाळी फाट्यावर गुरुवारी घडली. यात सुनील संजय सोनवणे (वय २७) हा तरुण मयत झाला आहे. साक्री तालुक्यातील शेवाळी गावाकडून दहिवेल गावाकडे एमएच १८ सीसी ४९८४ क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन जण जात होते.
शेवाळी फाट्यावर आल्यानंतर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीवरील सुनील संजय सोनवणे (वय २७, रा. दहिवेल, ता. साक्री) आणि गणेश पंडा मालचे हे दोघेही दुचाकीसह फेकले गेले. त्यांना जबर दुखापत झाल्याने दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सुनील सोनवणे या तरुणाचा मृत्यू झाला. तर गणेश मालचे याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मनोहर ओंकार सोनवणे यांनी साक्री पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मयत सुनील संजय सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.