मिनी ट्रक-कारची धडक दोन ठार, दोन जखमी

By Admin | Updated: July 5, 2017 11:39 IST2017-07-05T11:39:49+5:302017-07-05T11:39:49+5:30

दोंडाईचा - धुळे रस्त्यावर चिमठाणेनजीक सोमवारी रात्री झालेल्या मिनी ट्रक आणि कारच्या धडकेत दोन ठार आणि दोन जखमी झाले.

Two trucks collided with a car and two injured | मिनी ट्रक-कारची धडक दोन ठार, दोन जखमी

मिनी ट्रक-कारची धडक दोन ठार, दोन जखमी

 ऑनलाईन लोकमत

शिंदखेडा,दि.5 - दोंडाईचा - धुळे रस्त्यावर चिमठाणेनजीक सोमवारी रात्री झालेल्या मिनी ट्रक आणि कारच्या धडकेत दोन ठार आणि दोन जखमी झाले. हे चौघे कारमधून प्रवास करत होते. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या अपघातात दोंडाईचा येथील  ज्ञानेश्वर भालेराव पाटील (33 रा़ पटेल कॉलनी)  आणि प्रवीण बन्सीलाल लखोटे (45 रा़ स्वामिनारायण मंदिरामागे)  हे दोघे ठार झाले, तर शेखर जयवंत पाटील (29) आणि हिंमत भिका पाटील (28) दोघे रा़ङिारवे, ता़ शिंदखेडा हे जखमी झाले आहेत़ 
मिनी ट्रक एमएच 18-एए 3303 धुळ्याकडून दोंडाईच्याकडे जात होता तर दोंडाईच्याकडून धुळ्याकडे येणा:या एमएच 18-एजे 3977 क्रमांकाच्या कारची समोरासमोर धडक झाली.

Web Title: Two trucks collided with a car and two injured