दोन हजार कोरोनाबाधित ‘हायरिस्क’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST2021-06-03T04:25:47+5:302021-06-03T04:25:47+5:30

महानगरात १८ हजार ५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी १७ हजार ४४९ बाधित ...

Two thousand corona-bound ‘high risk’ | दोन हजार कोरोनाबाधित ‘हायरिस्क’मध्ये

दोन हजार कोरोनाबाधित ‘हायरिस्क’मध्ये

महानगरात १८ हजार ५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी १७ हजार ४४९ बाधित उपचारानंतर बरे झालेले आहेत तर २५७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. दरम्यान, १ मार्च २०२० ते ३१ एप्रिल २०२१ अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १४ हजार ४८१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, इतर जिल्ह्यांतील २ हजार ४३९ रुग्णांवर महानगरात उपचार करण्यात आलेले आहेत.

महानगरात १६२४१९ रुग्ण हाय व लो रिस्कमध्ये घेताय उपचार

महानगरातील ३४३ काेरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहे. या बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणारे १३ जणांची तपासणी केली जाते. त्यामुळे कोरोनाबाधित व त्याच्या संपर्कात असलेले आतापर्यत ३ लाख १८ हजार ४८७ हायरिस्कमध्ये व लोरिस्कमध्ये रुग्ण आढळून आले होत. त्यात हायरिक्समध्ये १ लाख ५९ हजार ८१ तर लोरिक्समध्ये १ लाख ५४ हजार ११६ रुग्ण महानगरात होते. दरम्यान, हाय व लोेरिस्क कोरोनाबाधितांची टक्का महानगराचा १९.३६ आहे.

गृहविलगीकरण रुग्णांवर उपचार

साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरीच वैद्यकीय उपचार करण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील बाधितांची मनपाकडून घरोघरी जावून तपासणी केली जाते तर साैम्य लक्षणे असलेल्या ३ लाख १८ हजार ४८७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सध्या ४ हजार ५५३ रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.

१६२९ कंटेन्मेट झोन मुक्त

बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्या घरांची सॅनिटायझर्स केले जाते तसेच परिवारातील सदस्यांची चाचणी करून सार्वजनिक ठिकाणी न जाण्याच्या सूचना दिल्या जातात. कोरोनापासून अन्य व्यक्तीला संसर्ग होऊ नये, यासाठी मनपाकडून आतापर्यंत शहरात ३ हजार ३७९ कंटेन्मेट झोन तयार केले होते. त्यातील ३ हजार २०३ झोन मुक्त झालेले आहेत तर सध्या १७६ झोन ॲक्टिव्ह आहेत.

या ठिकाणी होते स्वॅब तपासणी

कोराेनाकाळात नागरिकांना तातडीने कोरोना चाचणी करता यावी, यासाठी महापालिका आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये शहरातील प्रभागनगर, कृष्णानगर, नंदीरोड, हजार खोली, राऊडवाडी, विटा भट्टी, यशवंतनगर, मोहाडी, मच्छीबाजार, जुने जिल्हा रुग्णालय अशा दहा ठिकाणी चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लसीकरणाचे आवाहन

मनपा आरोग्य विभागाकडून नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. मनपाच्या प्रभागनगर, नंदीरोड, कुटुंब कल्याण केंद्र, कबीर गंज, अजय क्लिनिक, मोहाडी, बाळापूर, यशवंतनगर, सुभाषनगर, विटाभट्टी अशा अकरा ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कोरोना लस पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Two thousand corona-bound ‘high risk’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.