वार शिवारातून दुचाकींसह दोन तलवारी जप्त, तरूण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 17:56 IST2018-03-08T17:56:50+5:302018-03-08T17:56:50+5:30

पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनच्या गस्ती पथकाची मध्यरात्रीची कारवाई

Two swords seized with two-wheeler, two youths absconding | वार शिवारातून दुचाकींसह दोन तलवारी जप्त, तरूण फरार

वार शिवारातून दुचाकींसह दोन तलवारी जप्त, तरूण फरार

ठळक मुद्देदोन दुचाकीवर चार तरूण होतेपोलिसांना तरूणांचा आला संशयपकडले जाण्याच्या भीतीने तरूणांनी शेतात धूम ठोकली

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पश्चिम देवपूर पोलिसांच्या पथकाने मध्यरात्रीच्यावेळी तरूणांचा पाठलाग करून, त्यांच्याजवळून दोन दुचाकी,  दोन तलावारी, कोयता, रॉड  जप्त केले. मात्र ते तरूण  फरार होण्यात यशस्वी झाले. ही कारवाई वार शिवारात मध्यरात्री केली.
पश्चिम देवपूर पोलिसांचे पथक रात्रीच्यावेळी गस्तीला होते. त्यांना देवपुरातील इंदिरा गार्डनजवळ चार तरूण दोन दुचाकींवर जातांना दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने, पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र त्यांनी धूम ठोकल्याने, पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यांनी दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. पकडले जाऊ या भीतीने त्या चौघांनी वार गावाच्या शिवारात दुचाकी व त्यांच्याजवळी शस्त्र सोडून लगतच्या शेतात पळ काढला. पोलिसांनी  दोन दुचाकी व दोन तलावारी, एक कोयता , रॉड जप्त केला आहे.  या गस्ती पथकात पोलीस उपनिरीक्षक एस.के. पाटील, संजय पाटील, जी. आर. आखाडे, सुभाष मोरे आदींचा समावेश होता. पोलीस पळून गेलेल्या तरूणांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.


 

Web Title: Two swords seized with two-wheeler, two youths absconding