शहर पोलिसांनी पकडल्या दोन तलवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 12:14 IST2018-05-12T12:14:30+5:302018-05-12T12:14:30+5:30
शनिनगर भाग : आरोपीला घरातून अटक

शहर पोलिसांनी पकडल्या दोन तलवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री रोडवरील शनिनगर भागातील एका घरातून दोन तलवारी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून जप्त केल्या़ ही कारवाई शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजता करण्यात आली़ त्यानंतर मध्यरात्री गुन्हा दाखल झाला़
अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना शनिनगर भागात तलवारी असल्याची गोपनीय माहिती मिळाली़ माहिती मिळताच त्यांच्या विशेष पथकातील पोलीस कर्मचारी आणि शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील पोलीस कर्मचाºयांनी संयुक्त कारवाई केली़ साक्री रोडवरील शनिनगरात राहत असलेला नितीन मोहन कोळी (२३) याच्या राहत्या घरी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला़ या कारवाईत दोन तलवारी, कोयत्यासह लोखंडी पाटा जप्त करण्यात आला़ ही कारवाई शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास करण्यात आली़ याप्रकरणी संशयित नितीन कोळी याच्या विरुध्द मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला़
पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर शिंदे, विजय आटोळे, नाना आखाडे, योगेश शिरसाठ, विशाल लोंढे, राहुल सानप, संदिप पाटील, प्रल्हाद वाघ, एखलाक पठाण, दीपक दामोदर यांनी ही कारवाई केली़