धुळ्यानजीक महामार्गावरील वाहनांचे दोन शोरूम फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:08+5:302021-09-19T04:37:08+5:30
धुळे शहरातील मालेगाव रोडवरील नवकार हीरो शाे-रूम आणि धुव्र होंडा शो-रूम आहे. या ठिकाणी दुचाकीची खरेदी-विक्री केली जाते. शनिवारी ...

धुळ्यानजीक महामार्गावरील वाहनांचे दोन शोरूम फोडले
धुळे शहरातील मालेगाव रोडवरील नवकार हीरो शाे-रूम आणि धुव्र होंडा शो-रूम आहे. या ठिकाणी दुचाकीची खरेदी-विक्री केली जाते. शनिवारी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास नवकार हीरो शो-रूम याठिकाणी चोरट्यांनी शो-रूमचे मागील शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. सर्वत्र शोध घेऊन ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले दीड ते दोन लाख रुपये लंपास केले. ही चाेरी तीन चोरट्यांनी केली असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या ठिकाणी चोरट्यांनी हातसफाई केल्यानंतर त्यांनी आपली दिशा ध्रुव होंडा शो-रूमकडे वळविली. शटर तोडून आतमध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी ५० हजार रुपये रोकड लांबविली. शटरसह तिजोरीचे चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
दोन ठिकाणी चोरी झाल्याची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे, मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यापाठोपाठ श्वान पथक, ठसे तज्ज्ञही दाखल झाले होते. चोरी प्रकरणाची नोंद मोहाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, तपास सुरू आहे.