जोगशेलू येथील खून प्रकरणी दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 13:08 IST2019-04-27T13:08:08+5:302019-04-27T13:08:39+5:30

पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषद : पुरावा नसताना शिताफिने लावला तपास

Two people were arrested in the murder of Jogshalu | जोगशेलू येथील खून प्रकरणी दोन जणांना अटक

जोगशेलू येथील खून प्रकरणी दोन जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील जोगशेलू येथे अज्ञात व्यक्तीचा खून झाला होता़ पुरावा नसताना देखील स्थानिक गुन्हे शाखा आणि दोंडाईचा पोलिसांनी खुन कोणाचा झाला आणि कोणी केला हे अवघ्या चार दिवसांत शोधून काढले, अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ 
श्ािंदखेडा तालुक्यातील जोगशेलू येथे पवन युवराज वाघ (रा़ उधना, सुरत) याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता़ याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता़ दोंडाईचा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने घटनेचा संयुक्त तपास केला़ याप्रकरणी संशयित अधिकार उर्फ समाधान आनंदसिंग राजपूत आणि त्याचा साथीदार कोमलसिंग ढगेसिंग राजपूत या दोघांना जेरबंद केले़ अवघ्या चार दिवसात ही कामगिरी केल्याचेही पोलीस अधीक्षक यांनी सांगितले़ 

Web Title: Two people were arrested in the murder of Jogshalu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे