बल्हाणे येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 09:27 IST2020-05-23T09:20:43+5:302020-05-23T09:27:56+5:30

बाधितांच्या संपर्कातील चार जणांना तपासणीसाठी नेले

Two more positive patients were found at Balhane | बल्हाणे येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह

Dhule

पिंपळनेर- बल्हाणे ता.साक्री येथे आज सकाळी पुन्हा दोन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर त्यांच्या घरातील चार व्यक्तींना प्रशासनाने ताब्यात घेत तपासणीसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.
बल्हाणे गावात दि.१८ रोजी कोरोना रुग्ण मिळून आल्यानंतर दि.१९ रोजी कोरोना रुग्ण यांची पत्नीही पॉझिटिव्ह मिळून आली होती, तीन दिवसानंतर कोरोनाया संसर्गजन्य आजाराने पुन्हा डोके वर काढून नव्याने दोन रुग्णांची भर पडली आहे. यात यात एक पुरुष व एक महिला यांचा समावेश असल्याचे कळते तर कुटुंबातील चार व्यक्तींना आज सकाळी प्रशासनाने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून त्यांना जिल्हा आरोग्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यामुळे बल्हाणे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तर नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन होत आहे.

Web Title: Two more positive patients were found at Balhane

टॅग्स :Dhuleधुळे