आणखी दोन नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:04 IST2020-05-19T23:50:52+5:302020-05-20T00:04:54+5:30

जिल्ह्यात रुग्णाची संख्या झाली ८१

Two more new patients will be found positive | आणखी दोन नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

Dhule

धुळे- जिल्ह्यातील आणाखी ११ रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. त्यापैकी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाधीत रूग्णांची संख्या ८१ वर पोहोचली आहे तर कोरोनामुळे ११ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. नेहरू नगर परिसरात नवे ३ रूग्ण आढळले आहेत. इंद्रप्रस्थनगर मधील एकाचे तसेच जिल्हा कारागृहातील तिघांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. गल्ली नंबर सात येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच खंडेराव हौसींग सोसायटी येथील रहिवासी असलेल्या पुरूषाचा मृत्यू झाला. तसेच रात्री उशीरा दोन पॉजीटीव्ह रिपोर्ट प्राप्त झाले. बल्हाणे येथील बाधीत रूग्णाच्या पत्नीला तसेच शिरपूर शहरात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Two more new patients will be found positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे