धुळ्यातून दोन सोनपोत लांबविल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 19:12 IST2019-05-05T19:11:52+5:302019-05-05T19:12:17+5:30

‘धूमस्टाईल’ लूट : महिलांमध्ये धास्ती

Two lamps have been removed from the fire | धुळ्यातून दोन सोनपोत लांबविल्या 

धुळ्यातून दोन सोनपोत लांबविल्या 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील देवपुर भागातील जयहिंद चौक व शिवपार्वती कॉलनी अशा दोन ठिकाणी चोरट्यांनी मोेटारसायकलवरून येऊन सोनपोत हिसकावून पोबारा केल्याच्या घटना घडल्या. यामुळे नागरिकांमध्ये विशेषत: महिलांमध्ये धास्ती व्यक्त केली जात आहे़ यातील पहिली घटना शनिवारी रात्री तर दुसरी घटना रविवारी दुपारी घडली़ 
देवपुरातील जयहिंद चौकाकडून विष्णू नगरकडे जाणाºया रोडवर अरिहंत मोबाईल दुकान ते पानाबाई सिताराम पाटील बालमंदिर दरम्यान शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास रत्नाबाई नारायण वाघ (४४, रा़ मंगलमुर्तीनगर, ओमदादाजी मंदिराजवळ, पिंपळनेर ता़ साक्री) ही महिला पायी जात होती़ त्याचवेळेस २० ते २५ वयोगटातील दोन अनोळखी तरुण दुचाकीवरुन धुमस्टाईलने त्या महिलेजवळ तिच्या पाठीमागून आले आणि क्षणार्धात तिच्या गळ्यातील ३७ ग्रॅम वजनाचे ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पदक आणि १ तोळा वजनाची व १० हजार रुपये किंमतीचे मनीमंगळसुत्र असे एकूण ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज ओरबाडून नेला. घटनेनंतर त्या महिलेने आरडाओरड केली पण, अंधाराचा फायदा घेऊन या दोघा भामट्यांनी पोबारा केला़ लागलीच या महिलेने देवपूर पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली़ याप्रकरणी शनिवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलीस हेड कॉन्स्टेबल आय़ एऩ ईशी घटनेचा तपास करीत आहेत़ 
दुसरी घटना रविवारी देवपुरातील शिवपार्वती कॉलनीत भरदुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीवरून धूमस्टाईलने येऊन दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गळ्यातील सोनपोत हिसकावून पोबारा केला़ भरदुपारी अशा प्रकारची घटना घडल्यामुळे  महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे़ 

Web Title: Two lamps have been removed from the fire