शिरपूरला पावणे दोन लाखांची रस्तालूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:49 IST2020-01-06T22:49:09+5:302020-01-06T22:49:30+5:30

मोहिदा रोड : चार जणांविरुध्द गुन्हा नोंद

Two lakh road worth Rs | शिरपूरला पावणे दोन लाखांची रस्तालूट

शिरपूरला पावणे दोन लाखांची रस्तालूट

धुळे : दुचाकीने जाणाऱ्या तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्याकडील १ लाख ८८ हजाराची रोकड लांबविण्यात आल्याची घटना शिरपूर तालुक्यातील मोहिदा रोडवर सोमवारी सकाळी घडली़ याप्रकरणी चार जणाविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला़
शिरपुरातील क्रांती नगरात राहणारा मिलींद वसंत सोनवणे या तरुणाने शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, शिरपुर तालुक्यातील मोहिदा रोडवरुन दुचाकीने जात असताना धक्का देवून खाली पाडले़ हाताबुक्याने व दगडाने मारहाण करीत पंकज साहाया पावरा, दत्तू गुलाब पाडवी, वित्या तारासिंग पावरा, नवसिंग गुलाब पावरा (सर्व रा़ मोहिदा ता़ शिरपूर) हे १ लाख ८८ हजाराची रोकड घेऊन पसार झाले. या फिर्यादीनुसार शिरपूर पोलिसात सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे़

Web Title: Two lakh road worth Rs