चितोडगडजवळ उभ्या कारला ट्रकची धडक, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:17 IST2020-02-08T12:17:37+5:302020-02-08T12:17:59+5:30

शनिवारी पहाटेची घटना : दोंडाईचा, विखरणमध्ये हळहळ

Two killed in truck collision with a car parked near Chittorgarh | चितोडगडजवळ उभ्या कारला ट्रकची धडक, दोन ठार

चितोडगडजवळ उभ्या कारला ट्रकची धडक, दोन ठार

दोंडाईचा : राजस्थान राज्यातील चितोडगडजवळ रस्त्याच्या बाजुला उभी असलेली एमएच १८ बीसी २०९७ क्रमांकाच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली़ यात दोंडाईचाचे माजी बांधकाम सभापती महेंद्र पाटील यांचा मुलगा सौरभ आणि शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील अब्दुल सुभानसिंग पिंजारी या दोघांचा जागीच मृत्यू झाला़ अपघाताची ही घटना शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात अन्य तीन ते चार जण देखील जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ अपघाताची माहिती दोंडाईचा आणि विखरण गावात समजताच हळहळ व्यक्त करण्यात आली़

Web Title: Two killed in truck collision with a car parked near Chittorgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.