Two killed in heavy car collision | भरधाव कारची धडक जखमी दोघांचा मृत्यू
भरधाव कारची धडक जखमी दोघांचा मृत्यू

धुळे : तालुक्यातील गोंदूर गावाजवळ शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाºया कारने जोरदार धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील शिक्षक आणि शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली़ 
धुळे तालुक्यातील नवलाणे येथील अशोक भटा सूर्यवंशी (४९) हे मेहेरगाव येथील आरएससी विद्यालयात शिक्षक होते़ शुक्रवारी काही कामानिमित्त ते एमएच १८ एएम ८८३१ क्रमांकाच्या दुचाकीने धुळ्यात आले होते़ काम आटोपून नवलाणे गावाकडे रात्री १० वाजेच्या सुमारास ते दुचाकीने निघाले़ त्यावेळी त्यांच्या सोबत गोंदूर येथील शेतकरी प्रफुल्ल कल्याण पाटील (३३) हे होते़ गोंदूर गावाच्या वळण रस्त्यावर समोरुन येणाºया एका भरधाव कारने यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ यात शेतकरी आणि शिक्षक हे दोघे फेकले गेल्यांना परिणामी त्यांना जबर दुखापत झाली़ त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने या दोघांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना या दोघांची प्राणज्योत मालवली़ 
शुक्रवारी रात्री अपघात घडल्यानंतर दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू ओढवला़ अपघाताची बातमी कळाल्यानंतर सूर्यवंशी आणि पाटील यांचे कुटुंबिय रुग्णालयात पोहचले़ त्यावेळी त्यांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला़ 

Web Title: Two killed in heavy car collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.