शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

कार-लक्झरीबस अपघातात एक ठार दोन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:33 PM

झोडगे गावाजवळील घटना, अपघाताचा गुन्हा दाखल

ठळक मुद्देधुळ्याचे तिघे कामानिमित्त मालेगावला गेले होतेतेथून परतत असतांना अपघात झालाअपघातामुळे वाहतूक विस्कळीत

आॅनलाइन लोकमतधुळे : कार व लक्झरी बस यांच्यात झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर अन्य दोनजण जखमी झाले. हा अपघात ११ रोजी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावरील झोडगे गावाजवळील हॉटेल गिलजवळ झाला. जखमींवर मालेगाव येथील  रूग्णालयात उपचार सुरू आहेत.शहरातील राणा ट्रान्सपोर्टचे मालक प्रशांत पुनमचंद राठोड, जळगाववाला कुल्फी सेंटरचे मालक शेखर स्वरूप परदेशी, व देवपुरातील हॉटेल शांतीचे मालक तथा मल्ल गिरीश राजाराम चौधरी हे कामानिमित्त कारने (क्र. एमएच २०-बीसी २०९५) मालेगावला गेले होते. तेथून परतत असतांना झोडगे गावाजवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या ट्रॅव्हल्सने (क्र. एमपी ३०- पी ०९९०) जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचुर झाला. या अपघातात प्रशांत राठोड (४७, रा.धुळे) हे जागीच ठार झाले. तर शेखर परदेशी व गिरीश चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ मालेगाव येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे. तपास एएसआय भदाणे करीत आहेत.दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात