Two HiMast lamps started at Vasmar | वसमार येथे दोन हायमास्ट दिवे सुरू
Dhule


म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार या गावात मुख्य रस्त्यांकडेला दोन हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या स्थानिक विकास निधीतून (२५-१५) ही सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध झाली आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार शिवसेनेचे तालुका प्रमुख व कासारे ग्रा.पं.चे लोकनियुक्त सरपंच विशाल देसले व मंगेश नेरे यांच्या पाठपुराव्यामुळे निधी प्राप्त झाला. यावेळी सुभाष भामरे, भटू नेरे, संदीप नेरे, अनिल नेरे, संदीप नेरे, सोनू हिरे, मोहन सासके, संजय आजगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Two HiMast lamps started at Vasmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.