कढईपाणी येथे पाण्याच्या वादातून दोन गटात दंगल, ८ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST2021-04-30T04:45:09+5:302021-04-30T04:45:09+5:30
हरिनाम रजान पावरा (३५, रा. कढईपाणी) यांनी दिलेल्या फिर्यादीत, पाण्याच्या टाकीचा पाइप का फोडला, असे विचारले असता त्याचा ...

कढईपाणी येथे पाण्याच्या वादातून दोन गटात दंगल, ८ जखमी
हरिनाम रजान पावरा (३५, रा. कढईपाणी) यांनी दिलेल्या फिर्यादीत, पाण्याच्या टाकीचा पाइप का फोडला, असे विचारले असता त्याचा राग आल्याने संशयित आरोपी दयाराम आनंदसिंग पावरा, सयाराम ऊर्फ पुट्टन आनसिंग पावरा, नुरसिंग सखल्या पावरा, मन्साराम नुरसिंग पावरा, सुरेश नुरसिंग पावरा, भावसिंग नानला पावरा, पठाण नुरसिंग पावरा (सर्व राहणार कढईपाणी) अशा ७ जणांनी बेदम मारहाण केली़ त्या मारहाणीत हरिराम रजान पावरा (३५), बसंतीबाई हरिराम पावरा (३०), धावलीबाई रामलाल पावरा (५०), उमेश रामलाल पावरा (१८) असे चौघे जखमी झाले आहेत़ याबाबत ७ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
सरकारी पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व्ह का बंद केला, असे विचारले असता त्याचे वाईट वाटून दयाराम अनसिंग पावरा (३६) यास संशयित आरोपी हरिराम रजान पावरा, अनिल सुंदऱ्या पावरा, सुंदऱ्या वेलू पावरा, सुनील सुंदऱ्या पावरा, देविलाल राजाराम पावरा, पिक्या राजाराम पावरा, बबलू श्रीराम पावरा, जगल्या रामलाल पावरा अशा ९ जणांनी मारहाण केली़ या मारहाणीत सयाराम अनसिंग पावरा, नुरसिंग सकल्या पावरा, शिरुबाई भायसिंग पावरा, दयाराम वनसिंग पावरा हे जखमी झाले आहेत़
याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़