दोन गटात हाणामारी १६ जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:31 IST2019-05-31T18:31:12+5:302019-05-31T18:31:33+5:30
घड्याळवाली मशीद परिसर : पाच जखमी

दोन गटात हाणामारी १६ जणांविरुध्द गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील घड्याळवाली मशिदजवळ असलेल्या कैकाडी गल्लीत दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली़ याप्रकरणी १६ जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून यात ५ जणं जखमी झाले आहेत़
एका गटाकडून महेमूद वजीर अन्सारी (६०) यांनी फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, अल्पवयीन नातीकडे वाईट नजरेने पाहतो याचा जाब विचारल्याच्या राग आल्याने सादीक सिकंदर बेग, शरीफ सिकंदर बेग, फरीद अख्तर बेग उर्फ भैय्यू बेग, दानिश बेग बबलू बेग, अख्तर बेग गुलाब बेग, अनस बेग व मुझफ्फर बेग दिलावर अशा सात जणांनी महेमूद अन्सारी यांच्या घरावर दगडफेक केली़ त्यांना मारहाण केली़ यात अन्सारी यांच्यासह त्यांची भावजयी असे दोघे जखमी झाले़
तर, जाफर शब्बीर बेग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वेल्डींग दुकानातील पत्रा तोडण्याचा कर्कश आवाज येत असल्याने समजविण्यास गेले असता सोहेल वजीर अन्सारी, फरीद महेमूद अन्सारी, फिरोज मेहमूद अन्सारी, जावीद मेहमूद अन्सारी, आदिल सोहेल अन्सारी, फैय्याज जाकीर अन्सारी, सईद शकील अन्सारी, जाकीर वजीर अन्सारी, मेहमूद वजीर अन्सारी अशा नऊ जणांनी महेमूद वजीर अन्सारी यांचा भाऊ जावीद बेग, तस्वर बेग, अफसर बेग या तिघांना लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केली़ यावेळी तलवारीचा वापर करण्यात आला़ याप्रकरणी दोन्ही गटातील १६ जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ हाणामारीत पाच जणं जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़