बोरविहिर गावात दोन गट भिडले, हाणामारीत पाच जणांना दुखापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST2021-06-20T04:24:27+5:302021-06-20T04:24:27+5:30
एका गटाकडून सुनील पंडीत अहिरे या २५ वर्षीय तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास राजेंद्र ...

बोरविहिर गावात दोन गट भिडले, हाणामारीत पाच जणांना दुखापत
एका गटाकडून सुनील पंडीत अहिरे या २५ वर्षीय तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास राजेंद्र रामाजी नागापुरे, मारुती साहुजी नागापुरे, पवन राजेंद्र नागापुरे, ज्ञानेश्वर साहुजी नागापुरे या चौघांनी जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी झालेल्या मारहाणीत सुशील अहिरेसह पंडीत अहिरे, सागर अहिरे, सिमाबाई अहिरे असे चौघे जणं जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच धुळे ग्रामीणचे उपअधीक्षक प्रदीप मैराळे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक कैलास यांनी घटनास्थळी भेट दिली. तर सुशील याच्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करुन तपास उपअधीक्षक मैराळे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.
तर, दुसऱ्या गटाकडून ज्ञानेश्वर साहुजी नागापुरे (४३) या इसमाने तक्रार दाखल केली. त्यानुसार, सुशील पंडीत अहिरे हा त्यांच्या घरातील महिलांकडे वाईट नजराने पाहत असल्याने त्याला टोकले असता त्याचा राग येऊन सुशीलसह पंडीत राजाराम अहिरे, सागर पंडीत अहिरे, निलेश यशवंत अहिरे अशा चौघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत ज्ञानेश्वर नागापुरे जखमी झाले. तर त्यांनीही तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने सुशील अहिरेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस घटनांचा तपास करीत आहेत.