राज्यस्तरीय परिषदेत धुळे दंत शाखेला दोन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 22:53 IST2020-01-04T22:53:03+5:302020-01-04T22:53:40+5:30

५२ तंज्ञाचे मार्गदर्शन । नाशिक येथे राज्यस्तरीय दंत परिषद

Two awards to the Dhule Dental Branch at the state level conference | राज्यस्तरीय परिषदेत धुळे दंत शाखेला दोन पुरस्कार

Dhule

धुळे : महाराष्ट्र राज्य शाखेची ५७ वी राज्यस्तरीय दंत परिषद नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती़ परिषदेत धुळे दंत शाखेला दोन राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले
कार्यक्रमास महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ सुरेश मेश्राम, सचिव डॉ विकास पाटील, दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय भावसार, डॉ. कोचर उपस्थित होते़ कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती डॉ. दिलीप म्हैसकर होते़ राज्यस्तरावरील शालेय मुख आरोग्य शिक्षणावर उत्कृष्ट कार्यक्रम तसेच उत्कृष्ट वैज्ञानिक कार्यक्रम तर दुसरा बेस्ट सायंटिफिक असे दोन राज्यस्तरावरील पुरस्कार धुळे शाखेला मिळाले. धुळे शाखेचे सचिव डॉ. नितीन पाटील यांचा कुलगुरू डॉ. म्हैसकर व प्रमुख मान्यवर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. मेश्राम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
धुळे शाखेला राज्यस्तरीय पूरस्कार मिळवून दिल्याबद्दल डॉ. पाटील यांचे धुळयातील सर्व सदस्याकडून अभिनंदन केले.
सदर परिषदेस राज्यातून दन्तवैद्यकांनी सहभाग नोंदविला होतो़ या परिषदेस ५२ तज्ञांची विविध विषयांवर मार्गदर्शन केले़

Web Title: Two awards to the Dhule Dental Branch at the state level conference

टॅग्स :Dhuleधुळे