शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात सव्वादोन लाखांचे फर्निचर चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 21:37 IST

साक्री रोडवरील मॉल फोडले : मुख्य रस्त्यालगत चोरी झाल्याने आश्चर्य

धुळे - शहरात फर्निचरच्या एका मॉलमध्ये मोठी चोरी झाली असून चोरट्यांनी सुमारे सव्वादोन लाख रुपये किंमतीचे फर्निचर चोरुन नेले आहे़ शहर पोलीस ठाण्यापासून जवळच साक्री रोडवरील मॉलमध्ये चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़धुळे शहरातील साक्री रोडवर कुमारनगरलगत असलेल्या राहूल कॉम्प्लेक्समध्ये डिझायर फर्निचर मॉल आहे़ या मॉलमध्ये ४ आॅगस्ट रोजी रात्री आठ वाजेपासून ते ५ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान म्हणजे ४ आॅगस्टच्या मध्यरात्री ही चोरी झाली असावी, अशी माहिती पोलिसांनी दिली़चोरट्यांनी फर्निचर मॉलचे मागील दरवाजाचे कुलूप हॅक्सा ब्लेडने कापून मॉलमध्ये प्रवेश केला आणि मॉलमधील सुमारे २ लाख २७ हजार ९०० रुपये किंमतीचे फर्निचर चोरुन नेले़चोरीला गेलेल्या फर्निचरमध्ये १६ हजार, १४ हजार, १८ हजार, १५ हजार आणि १३ हजार ५०० रुपये किंमतीचे पाच टिपॉय, ६ हजार ५०० रुपये, ५ हजार, ५ हजार ८००, ७ हजार २००, ३ हजार ५००, ४ हजार २००, ४ हजार ७०० आणि ४ हजार ५०० रुपये किंमतीचे आठ चप्पल स्टॅण्ड तसेच १८ हजार रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही, ७० हजार रुपये किंमतीचा मोठा सोफा, १२ हजार रुपये किंमतीचे सहा सीसीटीव्ही कॅमेरे आणि १० हजार रुपये किंमतीच्या ४ क्विंटल वजनाच्या लोखंडी सळया इत्यादी साहित्याचा समावेश आहे़चार आॅगस्टला रात्री ही चोरी झाली़ ५ आॅगस्टला सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे राहुल बाळकृष्ण सोनवणे यांनी मॉल उघडला त्यावेळी मॉलमध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी तात्काळा पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली़घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ दरम्यान, उपविभागी पोलीस अधिकारी सचिन हिरे आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी देखील तातडीने घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली़याप्रकरणी मॉलचे मालक राहुल बाळकृष्ण सोनवणे (४९, रा़ १९ प्रोफेसर कॉलनी, देवपूर धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ या चोरीचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस़ पी़ तिगोटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे