साडेबारा हजार जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:40 IST2021-08-24T04:40:23+5:302021-08-24T04:40:23+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून शहरातील ...

साडेबारा हजार जणांनी घेतली लस
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून शहरातील विविध प्रभागात नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. संभाव्य कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करण्याचे आदेश प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातही दाेन ठिकाणी कोरोना लसीकरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आतापर्यंत गेल्या तीन महिन्यात सहा हजार २९१ जणांनी कोव्हॅक्सिन तर सहा हजार ३९१ जणांनी कोविशिल्ड लस घेतली आहे. अशा एकूण १२ हजार ६५२ जणांनी लस देण्यात आली देण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना सुविधा
दिव्यांग, अंध, ज्येष्ठ नागरिक तसेच लसीकरण केंद्रापर्यंत येऊ न शकणाऱ्या व्यक्तींना लसीकरण केंद्राबाहेर लसीकरण करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण केंद्राकडून आतापर्यंत २४ जणांना लसीकरण केंद्राबाहेर किंवा वाहनात लस उपलब्ध करून देण्यात येत आहे.
त्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका तथा लसीकरण अधिकारी डाॅ. आश्विनी भामरे, लसीकरण विभागाच्या प्रमुख सुवर्णा सूर्यवंशी, मीनाक्षी परदेशी, मनीषा बाविस्कर, पूजा थोरात, राजश्री कस्तुरे, संदीप घाटगे, दीपिका शुक्ला, वर्षा शिरसाठ, सागर घोडेस्वार, जयश्री बच्छाव, संग्राम पाटोळे, गिरीश परदेशी, राहुल गांंगुर्डे, ज्ञानेश्वर देवरे, राकेश जैन आदींचे सहकार्य मिळत आहे.