बारावीची पुरवणी परीक्षा सुरळीत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST2021-09-17T04:42:48+5:302021-09-17T04:42:48+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी केंद्रावर बारावीची परीक्षा झाली नाही. धुळे जिल्ह्यातून बारावीसाठी २२ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. अंतर्गत ...

Twelfth supplementary examination started smoothly | बारावीची पुरवणी परीक्षा सुरळीत सुरू

बारावीची पुरवणी परीक्षा सुरळीत सुरू

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी केंद्रावर बारावीची परीक्षा झाली नाही. धुळे जिल्ह्यातून बारावीसाठी २२ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर ३ ॲागस्ट २१ रोजी निकाल जाहीर झाला. त्यात २२ हजार ५४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ५५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते.

अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेला गुरूवारपासून सुरूवात झाली. ११ ॲाक्टोंबरपर्यंत ही परीक्षा सुरू राहील.या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रमाचे ९ तरजुन्या अभ्यासक्रमाचे ५२ असे एकूण ५९ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले आहेत. जिल्ह्यात धुळ्यातील दोन व साक्री, शिंदखेडा येथील प्रत्येकी एक-एक केंद्रावर परीक्षा होत आहे.

गुरूवारी इंग्रजीचा पेपर होता. केंद्रावर एक बाक सोडून विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. पहिला पेपर सुरळीत पार पडल्याचे सांगण्यात आले. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी तीन भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

दहावीची २२ सप्टेंबरपासून परीक्षा

दरम्यान इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा २२ सप्टेंबरपासून सुरू होईल. परीक्षेसाठी धुळ्यात दोन व साक्री, शिंदखेडा, शिरपूर येथे प्रत्येकी एक-एक अशा पाच केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी ४६ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले आहेत.

Web Title: Twelfth supplementary examination started smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.