मंगळवारी १७२ अहवाल पॉझिटिव्ह, तीन रूग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 21:36 IST2020-08-25T21:35:14+5:302020-08-25T21:36:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : मंगळवारी आणखी १७२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, धुळे ...

On Tuesday, 172 reports were positive, three patients died | मंगळवारी १७२ अहवाल पॉझिटिव्ह, तीन रूग्णांचा मृत्यू

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मंगळवारी आणखी १७२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये, धुळे शहरातील फॉरेस्ट कॉलनी व शिरपूर येथील रुग्णाचा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर धुळे तालुक्यातील सोनगीर येथील रुग्णाचा खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला.
मंगळवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ५७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील ५३, शिंदखेडा तालुक्यातील १७, शिरपूर तालुक्यातील ४४ व साक्री तालुक्यातील एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ४७८ इतकी झाली आहे.

Web Title: On Tuesday, 172 reports were positive, three patients died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.