ट्रकची दुचाकीला धडक वृद्ध ठार, एक गंभीर

By Admin | Updated: January 8, 2017 00:33 IST2017-01-08T00:33:43+5:302017-01-08T00:33:43+5:30

धुळे : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृध्द ठार एक जण गंभीर जखमी झाला आह़े

The truck's two-wheeler hit the old man, a serious one | ट्रकची दुचाकीला धडक वृद्ध ठार, एक गंभीर

ट्रकची दुचाकीला धडक वृद्ध ठार, एक गंभीर

धुळे : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृध्द ठार एक जण गंभीर जखमी झाला आह़े ही घटना शुक्रवारी दुपारी नागपूर- सुरत महामार्गावरील तालुक्यातील कासविहीर शिवारात घडली़ याप्रकरणी ट्रक चालकाविरुध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े
महादू माणिक पाटील (वय 72) हे मयत वृध्दाचे नाव आह़े तर निंबा वामन न्हावी (वय 47) दोघे रा़ म्हसवे ता़ पारोळा, जि़ जळगाव हे जखमी झाल़े दोघे 6 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्ऱ एमएच 19 यू 2175) पारोळ्याकडे धुळ्याकडे येत होत़े कासविहीर गाव शिवारातील मोरी क्ऱ 172 वरील रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणा:या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली़ त्यात महादू पाटील हे ठार झाल़े तर निंबा न्हावी हे गंभीर जखमी झाल़े तसेच दुचाकीचेही ुमोठय़ा प्रमाणात नुकसान झाल़े अपघातानंतर खबर न देता ट्रक चालका पसार झाला़
या प्रकरणी भगवान श्रीधर चौधरी (रा़ मुकटी ता़ धुळे) यांच्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरूध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादंवी कलम 304 अ, 279, 337, 338, 427 व मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ बी़ बी़ चौधरी करत आहेत़

Web Title: The truck's two-wheeler hit the old man, a serious one