हाडाखेडजवळ गव्हाचा ट्रक पेटला, लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 12:11 IST2018-04-16T12:11:14+5:302018-04-16T12:11:14+5:30

मुंबई आग्रा महामार्ग : पहाटेची घटना

A truck of wheat burst near Hadakhed, damages of millions | हाडाखेडजवळ गव्हाचा ट्रक पेटला, लाखोंचे नुकसान

हाडाखेडजवळ गव्हाचा ट्रक पेटला, लाखोंचे नुकसान

ठळक मुद्देहाडाखेडजवळ ट्रक पेटलाट्रकमधील गव्हाचे झाले नुकसानट्रकबाबत माहितीचे संकलन सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेडजवळ गव्हाचा ट्रक पेटला़ ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली़ यात लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे़ दुपारी १२ वाजेपर्यंत पोलिसात कुठलीही नोंद झालेली नव्हती़ 
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील हाडाखेड जवळ गव्हाचा ट्रक अचानक पेटला़ यात गव्हाच्या पोत्यासह ट्रकही पेटला़ परिणामी नुकसानीचा आकडा हा लाखोंच्या आसपास पोहचला आहे़ हा ट्रक पेटला कसा? ट्रक कुठून कुठे चालला होता़ यासह अन्य माहितीचे संकलन करण्याचे काम सुरु आहे़ त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत पोलिसात घटनेची नोंद करण्यात आलेली नव्हती़ 

Web Title: A truck of wheat burst near Hadakhed, damages of millions