चाकूहल्ला करत ट्रकचालकाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST2021-04-28T04:38:51+5:302021-04-28T04:38:51+5:30
रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेलंगणा राज्यातील मोहम्मद युनूस मोहम्मद शेख हा ५२ वर्षीय ट्रकचालक टीएस १२ युबी ०७३९९ ...

चाकूहल्ला करत ट्रकचालकाची लूट
रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेलंगणा राज्यातील मोहम्मद युनूस मोहम्मद शेख हा ५२ वर्षीय ट्रकचालक टीएस १२ युबी ०७३९९ क्रमांकाची ट्रक घेऊन सोनगीरकडून दोंडाईचाकडे जात असताना मेथी गावाजवळील फरशी पुलावर मोटारसायकलीवरून आलेल्या पाच जणांनी त्यांची ट्रक अडविला. त्यानंतर ट्रकचालकास मारहाण करत चाकूचा धाक दाखवून त्याच्या जवळील २३ हजार ५०० रुपयांची रोकड, १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. झोपलेले ट्रकमालक अवध नारायण अक्षयलाल यादव यांनाही मारहाण करत त्यांच्याजवळील ३० हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण ६५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटला. लूट केल्यानंतर या पाचही जणांनी तिथून पोबारा केला.
या घटनेनंतर ट्रकचालक मोहम्मद शेख याने शिंदखेडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक अनिल माने, पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे, कैलास दामोदर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तपास अंमलदार कैलास दामोदर यांनी तपासाची चक्रे फिरविली आणि सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पंकज पवार, सागर बोरसे, विनायक फुलपगारे, जितेंद्र अहिरे या चौघांना अटक केली. त्यांच्याजवळून १२ हजार रुपयांचा मोबाईल हस्तगत केला. त्यातील एकजण फरार झाला असून त्याच्या मागावर शिंदखेडा पोलीस आहेत.