गहू घेऊन जाणारा ट्रक बिजासन घाटात उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST2021-05-11T04:38:13+5:302021-05-11T04:38:13+5:30

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला़ सेंधव्याकडून शिरपूरकडे गहू भरून येणारा ट्रक बिजासन घाट उतरत असताना अचानक गाडीचे ब्रेक ...

A truck carrying wheat overturned in Bijasan Ghat | गहू घेऊन जाणारा ट्रक बिजासन घाटात उलटला

गहू घेऊन जाणारा ट्रक बिजासन घाटात उलटला

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला़

सेंधव्याकडून शिरपूरकडे गहू भरून येणारा ट्रक बिजासन घाट उतरत असताना अचानक गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे दुभाजकाला जाऊन आदळल्याने उलटला. या ट्रकमध्ये असलेला मोकळा गहू संपूर्ण रस्त्यावर पडला. त्यामुळे काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती सांगवी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन रहदारी पूर्ववत सुरू केली़ मात्र सदर घटना सेंधवा पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे काही वेळानंतर पोलिस माघारी परतलेत़ घटनास्थळी सेंधवा पोलिस दाखल होऊन हमालांच्या मदतीने रस्त्यावरील गहू बाजूला करत रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली़

या घटनेनंतर पुन्हा काही वेळानंतर म्हणजेच रात्री १ वाजेच्या सुमारास पेपर बंडल घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनाने दुजाभकाला धडक दिल्याची घटना या अपघातस्थळापासून हाकेच्या अंतरावर घडली़ या अपघातातील दोन्ही चालक जखमी झाले असून मध्यप्रदेश येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़

Web Title: A truck carrying wheat overturned in Bijasan Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.