आदिवासी संस्कृतीचे जतन करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:41 IST2021-08-20T04:41:58+5:302021-08-20T04:41:58+5:30
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व सी. गो. पाटील महाविद्यालय, साक्री येथील विद्यार्थी विकास विभाग ...

आदिवासी संस्कृतीचे जतन करणे गरजेचे
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व सी. गो. पाटील महाविद्यालय, साक्री येथील विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यातर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. डी. एल. तोरवणे, अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे, वक्ते डॉ. राहुल गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, डॉ. पंकजकुमार नन्नवरे, प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन नांद्रे, धुळे जिल्हा विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. हाशिम शेख प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थित होते.
प्रमुख वक्ते श्रीगोंदा महाविद्यालयाचे डॉ. राहुल गायकवाड यांनी आपल्या भाषणात ‘आदिवासींचा इतिहास आणि संस्कृती’ या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. वीर एकलव्य, जननायक बिरसा मुंडा, क्रांतिकारक तंट्या भिल, शबरी माता, इत्यादींच्या रामायणापासूनच्या योगदानावर विविध उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. क्रांतिकारकांच्या व जननायकांच्या प्रभावी व देदीप्यमान लढ्याचा इतिहास आदिवासी समुदायास लाभलेला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व आत्मसन्मान मिळविण्यासाठी ब्रिटिशांविरोधात आदिवासी बांधवांनी उठविलेला आवाज ऐतिहासिक असल्याचे मत त्यांनी मांडले. स्वाभिमान व आत्मसन्मानाच्या या लढ्याचा व संस्कृतीचा आदर सर्वांनी केला पाहिजे. आदिवासी समाजाच्या उन्नती व विकासासाठी भारतीय संविधानात भरीव तरतूद केली असून, समाजबांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, असेदेखील मत त्यांनी प्रसंगी मांडले.
पिंपळनेरचे प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे यांनी आदिवासींमधील सद्गुणांचे, बुद्धिचातुर्याने कौतुक केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी आदिवासी समुदायाची जीवनशैली ही वैविध्यपूर्ण असून, समाजात असलेली शिस्त, नियमशीरपणा, वर्तणूक, मातृसत्ताक स्त्रीप्रधान संस्कृती, आदी गुणांचा स्वीकार सर्वत्र व्हावा, असा आशावाद व्यक्त केला. निसर्गदत्त आयुष्य जगत असताना आदिवासी समुदायाच्या जगण्यात स्वच्छतेला व आरोग्याला विशेष महत्त्व असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश पाटील, अध्यक्षा मंगला पाटील, उपाध्यक्ष चंद्रजित पाटील यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. लहू पवार यांनी प्रास्ताविक केले. महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ज्योती वाकोडे यांनी संचलन केले; तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. विश्वास भामरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संयोजन समितीचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ अशोक निकम, प्रा. सुनील पालखे, डॉ. प्रदीप राठोड, डॉ. हसीनखा तडवी, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कार्यालय अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला १९२ जण ऑनलाईन उपस्थित होते.
190821\img-20210806-wa0040.jpg
ऍड. जी. एन. पवार